Ichalkaranji Dargah : Hazart Sayyad Makhdum shah baba rah :दरगाह हजरत सुलतान सय्यद मख्दुम मुलतानी बाबा रह.इचलकरंजी
🇮🇳इचलकरंजीतील सूफी अवलियाची दर्गा🚩
🇺🇳बाबा हजरत सय्यद मख्दूम शाह वली रहमतूल्लाह आलेह🇹🇷
हजरत सय्यद मख्दुम बाबांची जीवनगाथा
मध्ययुगीन काळात मध्य एशियातून ईश्र्वर साधना करत सूफी संत हिंदुस्थानात येऊ लागले. प्रेम,मानवता,एक ईश्वरवाद चा संदेश देऊ लागले. सूफी संतांना हिंदुस्थानी लोक आदराचे स्थान देऊ लागले.त्या सूफी संप्रदाया मध्ये *हजरत सय्यद मख्दुम शाह बाबा रहमतूल्लाह आलेह* याचा उल्लेख आवर्जून मिळतो.हजरत मख्दूम बाबा मूळचे मुल्तान प्रांताचे राजघराण्यातील युवराज व प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे वंशज आहेत.राजत्याग करून स्वत अल्लाह च्या स्वाधीन झाले.
ह.मख्दुम बाबा मुल्तान,हैद्रबाद(आजचे पाकिस्तानातील पंजाब प्रांत)दिल्ली,मिरज मार्गी देवध्यान करत इचलकरंजी या भागात आले.पूर्वी इचल,उचल,करंजी या तीन छोट्या राहीवाशी वाड्या होत्या.हजरत मख्दूम बाबानी या तिनी वाड्याचे एक गाव अिचलकरंजी वसवले.नरभक्षक राक्षस लोकाना खूप त्रास देत असे.बाबानी त्या राक्षसाचा वध करून नायनाट केला व गावाची जबाबदारी पिरगोण्डा या इस्मास दिले.बाबाच्या कडे ईश्वरीय प्राप्त शक्ती असल्याचे कळता परिसरातील लोक आपल्या दर्शनाला येऊ लागले.दर्ग्या आतील गाभाऱ्यात हजरत सय्यद मख्दूम बाबा रहमतूल्लाह आलेह व सुपुत्र हजरत सय्यद युसूफ रहमतूल्लाह आलेह व सून मां सय्यदा आयेशाबीबी रहमतूल्लाह आलेह याची समाधी स्थळे आहेत व छोटीशी समाधी सुध्दा आहे दर्ग्याचे जुने वास्तू बांधकाम बहमनी राजवटीत झाले आहे.
दर्ग्यातील पितळेच्या दारावर काहीसे असे लिहलेले आहे.
*{सताप्पा कचाप्पा तेली कचरे शु.कार्तिक ॥ शके १६१५.}* या वरून पितळेचे दार किती जुने आहे याचा अंदाज येतो.
हजरत सय्यद मख्दुम बाबांच्या दर्ग्याला सर्व धर्मिय लोक दर्शनाला येतात.बाबाचा ऊरुस इस्लामिक हिजरी तिथी प्रमाणे 23,24,25 सफर रोजी अगदी गुण्यागोविंदाने साजरा होतो.
मख्दुम शाह वलीचे चमत्काराचे किस्से खूप आहेत पण आज ही जुने गावकरी दर्ग्याला येतात व आपल्या आयुषातिल अनुभव व्यक्त करतात.म्हणून इंग्रज अधिकारी आपल्या पुस्तकात बाबांचा उल्लेख असा करतो*हजरत मख्दुम बाबांची दर्गा जिवंत देवस्थान आहे व इचलकरंजी पंचक्रोषित किर्तिवान आहे*पूर्वी पासून समस्त मुजावर लोक बाबांची खिदमत व देखरेख करतात
रेफरन्स:1:गाव पाटील यांच्या संग्रालयातून
2:आपटे वाचन मंदिर वाचनालय
3:कुडचितील अवलिया दफ्तर
टिप्पणियाँ